मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. आजपासून ऑनलाईन अर्जाला सुरुवात. ही कागदपत्रे ठेवा तयार.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 2024 :

आजपासून ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी, होणार सुरुवात. ही कागदपत्रे ठेव आता.अर्ज भरण्यासाठी ची प्रक्रिया त्यासाठीच्या, तारखा पुढीलप्रमाणे असतील :

  1. अर्ज करण्याची सुरुवात – १ जुलै.
  2. प्रारूप निवड यादी प्रकाशित – १६ ते २० जुलै.
  3. प्रारूप यादीवर हरकत तक्रार करणे – २१ ते ३० जुलै.
  4. लाभार्थी अंतिम निवड यादी प्रकाशित – १ ऑगस्ट.
  5. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – १५ जुलै.
  6. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यास सुरुवात – १४ ऑगस्ट पासून.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे :

  1. योजनेचा लाभ घेण्यासाठी, ऑनलाईन अर्ज.
  2. उमेदवाराचे आधार कार्ड.
  3. महाराष्ट्र राज्याचे आदिवासी प्रमाणपत्र, किंवा महाराष्ट्र राज्यातील जन्माचा दाखला.
  4. बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत.
  5. पासपोर्ट साईटचा फोटो.
  6. सक्षम प्राधिकार्‍याने दिलेला कुटुंबप्रमुखांचा उत्पन्नाचा दाखल.
  7. रेशन कार्ड.
  8. सदर योजनेसाठी, ज्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र.

काय आहे ही योजना ?

पहिल्या टप्प्यात

  1. दारिद्र्यरेषेखालील 90 ते 95 लाख महिलांना महिन्याला 1200 ते 1500 रुपये लाभ.
  2. महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य तसेच, त्यांच्या आरोग्याची काळजी घेतानाचा गरीब महिलांना, आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी योजना.
  3. दारिद्र रेषेखालील 21 ते 60 वर्ष वयोगटातील, महिला तसेच घटस्फोटीत महिला, विधवा महिला परितक्य यांना या योजनेचा लाभ.
  4. प्रत्येक महिन्याला लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट रक्कम जमा होणार.

एस टी महामंडळाने घेतला मोठा निर्णय यापुढे पुरुषांनाही मिळणार 50 टक्के मोफत प्रवास पहा.

कोण ठरेल अपात्र?

कोणत्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. हेही सरकारने स्पष्टपणे नमूद केलेलं आहे. ते तुम्ही खालील मुद्द्यावरून समजून घेऊ शकता.

अपात्रता :

  1. ज्यांच्या कुटुंबातले एकत्रितपणे वार्षिक उत्पन्न 2 लाख 50 हजार रुपये पेक्षा अधिक आहे. अशांना लाभ घेता येणार नाही.
  2. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित/कायम कर्मचारी/ कंत्राटी कर्मचारी/म्हणून सरकारी विभागीय मंडळ उपक्रम भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत. किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत. परंतु बाह्य यंत्रणा द्वारे, कार्यरत आहेत तथा स्वयंसेवी कामगार, आणि कर्मचारी पात्र ठरणार नाहीत.
  3. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे.
  4. ज्यांच्या कुटुंबातील, सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहेत.
  5. सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या, इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक, योजनेद्वारे रुपये पंधराशे पेक्षा जास्त लाभ घेतलेला असेल तर.
  6. ज्यांच्या कुटुंबातील, सदस्यांची संयुक्तपणे 5 एकर पेक्षा जास्त शेत जमीन आहे.
  7. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड/ कार्पोरेशन बोर्ड/ उपक्रमाचे अध्यक्ष /उपाध्यक्ष /संचालक/सदस्य आहेत.
  8. ज्यांच्याकडे, चार चाकी वाहने (ट्रॅक्टर वगळून) त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावरून नोंदणीकृत आहे.
  9. हे सदस्य या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही. ते या योजनेसाठी अपात्र ठरतील.

या योजनेमध्ये पात्रता व अपात्रता निकषांमध्ये सुधारणा करण्याची, आवश्यकता असल्यास नियोजन व वित्त विभागाकडे अभिक्रिया घेऊन, शासन मान्यतेने कार्यवाही करण्यात येईल.

Leave a Comment