शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! आता या तारखेपर्यंत करता येणार फवारणी पंपाला मोफत अर्ज.येथे पहा अर्ज प्रक्रिया

शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर आता या तारखेपर्यंत करता येणार फवारणी पंपाला मोफत अर्ज पाहूया अर्ज प्रक्रिया. :

नमस्कार शेतकरी मित्रांनो, सन 2024 आणि 25 मध्ये या योजनेअंतर्गत चालू असलेल्या, हंगामामध्ये बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपाचा पुरवठा करण्यासाठी, लाभार्थ्यांची निवड ही महाडीबीटी पोर्टलवर केलेल्या, ऑनलाईन अर्जाद्वारे करण्यात येणार असल्याचे, सांगण्यात आलेले आहे. तर मित्रांनो, जे इच्छुक आहेत तसेच पात्र शेतकरी आहेत. त्यांनी महाडीबीटी पोर्टल दिनांक 14 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करण्यासाठी, मुदतवाढ देण्यात आलेले आहे. याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी तसेच, सोयाबीन कापूस इतर तेलबिया आधारित पीक पद्धतीस चालना देऊन, शेतकऱ्यांच्या उत्पन्नास भरघोस वाढ करून, कापूस सोयाबीन व इतर तेलबिया पिकातील मूल्य साखळीस चालना देणे. याच उद्देशाने राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस सोयाबीन आणि इतर तेलबिया उत्पादनात उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकासासाठी, विशेष कृती योजना 2022-23 ते 2024 25 या तीन वर्षात राबवण्यात येत आहे ते आपण पाहत आहोत.

या योजनेसाठी अर्ज कुठे करायचा ते आपण पाहूयात :

तर मित्रांनो या योजनेसाठी, जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी अर्ज करण्यासाठी, खाली दिलेल्या वेबसाईटवर जाऊन अर्ज प्रक्रिया करायचे आहे.

अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा.

या वेबसाईटवर जाऊन, जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी अर्ज करायचा आहे. आणि या योजनेचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यायचा आहे. असे अहवाल कृषी विभागामार्फत करण्यात आलेले आहे. तसेच तुम्हाला यात काही अडचण आल्यास मदत लागत असेल, तर तुमच्या जवळील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तसेच, उभवी उपविभागीय कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी या कार्यांच्या कार्यालयाशी संपर्क साधायचा आहे.

Leave a Comment