रेशन संदर्भात सरकारांचा मोठा निर्णय आता रेशन मिळवण्यासाठी हे महत्त्वाचे काम करावे लागणार आहे.

नमस्कार मित्रांनो, शिंदे सरकारने आता रेशन संदर्भात हा निर्णय घेतला आहे. रेशन वाटपासाठी सर्वर मध्ये महिनाभरापासूनच तांत्रिक दोष निर्माण झाला यामुळे, धान्य वाटपालाही अडचण येत आहेत. नागरिकांना रांगेत उभे राहावे लागत आहे रांगेत उभे राहूनही धान्य मिळत नाही. अशा अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

यामुळे, सर्व दुरुस्ती होईपर्यंत ऑफलाईन पद्धतीने पुरवठा विभागातील, अधिकाऱ्यांच्या निगराणी खाली धान्य वाटप करायला आता शासनाने परवानगी दिलेली आहे. मात्र धान्य वाटप झाल्यानंतर त्यांची ऑनलाइन माहिती भरावी लागणार आहे. असे जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांनी सांगितलेले आहे.

तसेच, दर महिन्याला रेशनवरील धान्याचे वाटप ई पॉश मशीनद्वारे करण्यात येते. नुकत्याच 2G मशीन बदलून 4G या अत्याधुनिक मशीन देण्यात आलेला आहेत. मात्र अजूनही गेल्या काही दिवसांपासून सर्वर डाऊन असल्याने, रेशन वाटप करण्यासाठी मोठी अडचण येत आहे. याचमुळे काही ठिकाणी निम्मेच धन्य वाटप झालेले आहे. तर काही ठिकाणी वाटप बंदच आहे. इ के वाय सी ची प्रक्रिया ही केवळ 40 ते 45% झालेली असून, त्यामुळे रेशन दुकानदारांनी सर्वर पूर्ववत, सुरू होईपर्यंत ऑफलाईन पद्धतीने नोंदी घेऊन रेशन वाटपाला परवानगी द्यावी, अन्यथा एकऑगस्टला ई पॉश मशीनची अंत्ययात्रा काढण्याचा इशारा दिलेला आहे.

या 21 कारणांमुळे फॉर्म होणार रद्द पहा. तुमचा फॉर्म रद्द झाला का येथे चेक करा

यावर काहीतरी उपाय काढण्यासाठी, गेल्या आठवड्यामध्ये रेशन दुकानदार संघटनांची मुंबईमध्ये बैठक झालेली होती. या बैठकीवर यावर तोडगा काढण्यासंदर्भात, चर्चा झाल्यानंतर कक्षा अधिकारी आशिष अत्राम यांनी रेशन दुकानातून धान्याचे, ऑफलाइन वाटप करण्याचे आदेश जारी केलेले असून, धान्याचे वाटप ऑफलाइन करण्यास परवानगी दिलेली असली, तरीही त्यावर शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांचे पूर्णपणे लक्ष राहणार आहे. आणि दुकानदारांनी वाटपाबाबतीत नोंदीप्रमाणेच कराव्या लागणार असून, या काळात ऑफलाइन विक्रीत केलेल्या, धान्याचा तपशीला व्यवस्थितपणे शासनाला सादर करावा लागणार आहे. वितरित केलेल्या धन्याचा तपशीला पोर्टलवर भरावा लागणार असल्याचे, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांनी सांगितलेले आहे.

Leave a Comment