शासनाने केले पिकांच्या हमीभावामध्ये बदल, नवीन हमीभाव केले जाहीर.

केंद्र शासनाने आत्तापर्यंत, सोयाबीनच्या हमीभावामध्ये फक्त 292 रुपयांनी वाढ केली होती. तेही 2024-25 साठी, व त्यासाठी त्याचा हमीभाव हा 4892/- इतका जाहीर केला गेला होता. त्याचप्रमाणे कापसाच्या बाबतीत, बघायला गेले तर हमीभावामध्ये 500/- एक रुपयांची वाढ केली गेली होती. तथापि हंगामात आता मध्यम धाग्याचा कापूस, हा जवळपास 7121/- रुपयांनी व त्याचप्रमाणे, लांब धाग्याचा कापूस हा 7521/- रुपयांनी यांचा हमीभाव जाहीर केला आहे. त्याचप्रमाणे, तुरीचा हमीभावात देखील बदल केला आहे. तर 550/- रुपये तुरीचा हमीभाव व पुढील 450/- रुपयांनी वाढ केली आहे.

यावर्षी राज्यातील शेतकऱ्यांनी, लोकसभा निवडणुकीमध्ये शासनाला चांगला दणका दिला आहे. मतपेटीतून. त्यामुळे, शेतकरी वर्ग खुश करण्यासाठी, शासन एक चांगला निर्णय घेणार अशी, चर्चा असताना भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी व भारताचे कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान, हे असे भासत होते. की शासन खाद्यतेल व कडधान्य उत्पादनामध्ये, आत्मनिर्भर चा दिशेने होण्यासाठी, शेतकऱ्यांना शासन प्रोत्साहित करणार आहे. व हमीभावात देखील चांगले वाढ करणार आहेत. असे शक्यता सर्व ठिकाणातून, व्यक्त केले जात होते. त्याचप्रमाणे शासनाने सोयाबीन उत्पादकांची, तर नाराजी केलीच असे म्हणावे लागेल.

केंद्र शासनाने, 19 तारखेला खरीप हंगामातील जवळपास 14 पिकांचा किमान, आधारभूत किंमत हमीभाव, हा जाहीर केला होता. तसेच शासनाने, तुरीच्या हमीभावात देखील 550/- रुपयांची वाढ केली होती. त्याचप्रमाणे नव्या हंगामातील, आता तुरीचा हमीभाव हा 7550/- रुपये असेल. गेल्या हंगामानुसार 7000/- रुपये हमीभाव होता. तसेच मुगाच्या हमीभावात देखील, फक्त 124/- रुपयांची वाढ केली. म्हणजेच 8682/- रुपये केला. त्याचप्रमाणे उडदाला सुद्धा 450/- रुपयांचा हमीभाव दिला. उडदाला सध्या 7400/- चा हमीभाव मिळत आहे.

सोयाबीनला, किमान 6000 रुपयांचा तरी हमीभाव जाहीर करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत होती. कारण सोयाबीनचा उत्पादन खर्चामध्ये, प्रचंड वाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या, संतप्त भावना स्पष्ट होत आहेत. अशा मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्र शासनाकडे, 5100/- हमीभाव मिळावा. अशी मागणी केली होती. अशामुळे किमान हमीभाव मिळावा, अशी अपेक्षा शासनाची होती. पण केंद्र शासनाने फक्त 292/- रुपयांचे यामध्ये वाढ केले. म्हणजेच 4892/- एवढाच हमीभाव शासनाकडून जाहीर करण्यात आला. अशामुळे देशातील राज्यातील, सोयाबीन उत्पादक शेतकरी शासनावर नाराज आहेत. असल्याचे चित्र आहे.

अशाच प्रकारचे, शेतकऱ्यांविषयीची माहिती, नवनवीन अपडेट्स, तुम्हाला आमच्या ग्रुपला मिळतील. आमच्या ग्रुपला कनेक्ट होण्यासाठी, खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/CR5EJ95Thxb67kzSiLbyiK

Leave a Comment